Wed, Sep 19, 2018 14:22होमपेज › Satara › सातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video)

सातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video)

Published On: Jan 03 2018 4:30PM | Last Updated: Jan 03 2018 3:56PM

बुकमार्क करा
औंध : वार्ताहर

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवीच्या पौषी रथोत्सवास "आई उदे ग अंबे उदेच्या"जयघोषात गुलाल खोबरे अतिशय उत्साही ,भावपूर्ण वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. त्या अगोदर बुधवारी सायंकाळी औंध येथील सर्वात उंच दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. यावेळी दीपमाळेच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर तेजोमय झाला होता.

गुरुवारी दुपारी बारा वाजता येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीचे पूजन आमदार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर  श्रीयमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्सव मूर्ती गाभाऱ्यात आणण्यात आली.त्यानंतर राजकन्या श्रीमंत हर्षिताराजे  यांच्या हस्ते देवीचे गाभार्यात षोडषोपचारे पूजन करण्यात आले.  यावेळी मंत्रपठन  ,महाआरती व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.पौरोहित्यपठन  गणेश इंगळे,नंदकुमार जोशी, अनिकेत इंगळे यांनी केले. त्यानंतर प.पू.सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीचे चौपखळयाजवळ पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीची  पालखीत प्रतिष्ठापना करून रथापर्यंत पालखीची फेरी नेण्यात आली. त्याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते रथामध्ये श्रीयमाईदेवीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.