Wed, Jun 26, 2019 18:21होमपेज › Satara › लिंबतील रामेश्‍वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू 

लिंबतील रामेश्‍वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू 

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 9:26PM

बुकमार्क करा

लिंब : वार्ताहर

लिंब ता. सातारा येथील ऐतिहासिक कृष्णा नदीच्या घाटावरील रामेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. 

लिंब येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर ऐतिहासिक दगडी कोरीव घाट आहे. घाटावर मोठ्या प्रमाणात मंदिरे सुद्धा आहेत. 

यामध्ये एक रामेश्‍वराचे मंदिर आहे. या मंदिराचे कामही कोरीव दगडात करण्यात आलेले आहे. या मंदिराचा कळसाची मोठी दुरवस्था झाली होती. कळसाच्या दुरुस्तीचे काम करण्याचा विचार येथील युवकांमध्ये आल्याने त्यांनी प्रथमतः स्वतः वर्गणी गोळा करून कळसाच्या कामास सुरुवात केली. 

त्यास लिंब गावातील लोकांनी आर्थिक मदत केली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन श्री रामेश्‍वर जीर्णोद्धार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.