Thu, Jan 17, 2019 16:58होमपेज › Satara › सातार्‍यात महिलेचा खून; कारण अस्पष्ट

सातार्‍यात महिलेचा खून; कारण अस्पष्ट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील तामजाईनगर येथे फ्लॉवर व्हॅली या अपार्टमेंटमध्ये लता बापूराव सावंत (वय 42) या महिलेचा धारदार शस्त्राने अनोळखींनी खून केल्याने परिसर हादरला आहे. रविवारी भरदिवसा ही घटना घडली.  

लता सावंत या प्लास्टिक कंपनीमध्ये कामाला असून, तामजाईनगरमध्ये त्या मुलीसमवेत अपार्टमेंटच्या गाळ्यात वास्तव्य करत होत्या. रविवारी दुपारी त्या एकट्याच घरी होत्या. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला.जखमी अवस्थेत त्या बाहेर आल्या व तेथेच कोसळल्या. ही घटना काहीजणांनी पाहिल्यानंतर तत्काळ त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लता सावंत रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दरम्यान, उंब्रज येथील दरोडा व खून, घरफोडींचे वाढते प्रमाण यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.                   

कामाच्या ठिकाणी झाला होता वाद...

लता सावंत या करंजे येथे काम करत होत्या. कामाच्या ठिकाणी शनिवारी साफसफाईवरून त्यांचा वाद झाल्याचे समोर येत आहे. वाद झाल्यामुळे  रविवारी त्या कामाला गेल्या नव्हत्या. दरम्यान, लता सावंत यांचा पतीशी वाद असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या पतीपासून विभक्‍त राहत आहेत. पोलिसांनी या दोन्ही घटनेची नोंद घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.