होमपेज › Satara › इनोव्हा-दुचाकी अपघातात महिला ठार

इनोव्हा-दुचाकी अपघातात महिला ठार

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:24PM

बुकमार्क करा

वाई : प्रतिनिधी

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सुरूर येथील महामार्गावर वहागाव फाट्याजवळ इनोव्हा व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या केंजळ (ता. वाई) येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य एकजण जखमी झाला  आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इनोव्हा (एम.एच. 12 केवाय 4320) ही पुण्याहून सातार्‍याकडे जात होती. तर दुचाकीही (एम.एच. 11 बीएन 1220) सातारच्या दिशेला जात होती. परंतु, दुचाकीने अचानक वळण घेऊन विरुद्ध दिशेने जाताना समोरून आलेल्या इनोव्हाला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील उदय राजाराम कदम व शालन राजेंद्र कदम हे दोघेही गंभीर जखमी झाले.

त्यांना पुढील उपचारासाठी गीतांजली हॉस्पिटल, वाई येथे दाखल केले असता उपचारादरम्यान शालन राजेंद्र कदम (वय 47, रा. केंजळ) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, तपास स.पो.नि. बाळासाहेब भरणे, हवालदार प्रवीण ढमाळ करीत आहेत.