Wed, May 27, 2020 07:46होमपेज › Satara › लाभार्थ्यांची निवड मात्र निधी वेळेत संपणार का?

लाभार्थ्यांची निवड मात्र निधी वेळेत संपणार का?

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 10:57PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्हा परिषदेच्या  सेस फंडातून महिला व बालक विकास विभागाला मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाख 94 हजार निधीपैकी  1 कोटी 10 लाख 53 हजार 232 रुपये फक्त खर्च झाले आहेत. मात्र पिको फॉल मशिन, पिठाची गिरणी, शिलाई मशिन आदी वस्तुसाठी लाभार्थ्यांची निवड केली असली तरी लाभार्थी मार्च एंडपर्यंत वस्तू खरेदी करून त्यांना निधी वेळेत मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

महिला व बालक विकास विभागास जिल्हा परिषदेच्या सेसमधून 2 कोटी 20 लाख 94 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आतापर्यंत मंजूर निधीपैकी 1 कोटी 10 लाख 53 हजार 232 रुपये म्हणजेच 50 टक्के निधी खर्च झाला आहे. महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या अभ्यास दौर्‍यासाठी 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती नुकतेच समितीचे सदस्य अभ्यास दौर्‍यासाठी केरळ येथे गेले होते. त्यामुळे हा निधी खर्च झाला आहे. महिलांसाठी समुपदेशन केंद्रासाठी 2 लाख 18 हजार 199 रुपये, अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत बांधकाम व दुरूस्तीसाठी 6 लाख 38 हजार 319 रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

सातवी बारावी उत्तीर्ण मुलींना  एम.एस.सी.आय.टी प्रशिक्षणासाठी 17 लाख 64 हजार  रुपये, मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी 18 लाख 73  हजार 890 रुपये, आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे 41 हजार रुपये, किशोर वयीन मुलींना महिलांना जेंडर, आरोग्य कुटुंब नियोजन प्रशिक्षण 5 लाख रुपये, ग्रामीण भागातील  चौथी ते दहावी व महाविद्यालयीन मुलींना ज्युदो कराटे व योगासाठी 4 लाख 92 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पाचवी ते बारावीतील मुलींना लेडीज सायकल पुरविणे 10 लाख 29 हजार 600 रुपये खर्च झाले आहेत. पिठाची गिरणीसाठी 29 लाख 50 हजार रुपये मंजूर होते त्यापैकी 14 लाख 4 हजार रुपये खर्च झाले आहेत. शिलाई मशिनसाठी 14 लाख रुपयापैकी 9 लाख 82 हजार 800 रुपये खर्च झाले आहेत. पिको फॉल मशिनसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 9 लाख 900 रुपये खर्च झाले आहेत. अंगणवाड्यांना विविध साहित्य  पुरविण्यासाठी 14 लाख 47 हजार रुपयांची तरतूद होती त्यापैकी 8 लाख 57 हजार 87 रुपये खर्च झाले आहेत.

एम.एस.सी.आय.टी व टंकलेखन  प्रशिक्षणासाठी तालुक्याच्या विविध प्रशिक्षण केंद्रात लाभार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यासंदर्भात पंचायत समिती स्तरावर संबंधित लाभार्थ्यांचे पैसे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण भागातील चौथी ते दहावी व महाविद्यालयीन मुलींना ज्युदो कराटे प्रशिक्षण शाळा महाविद्यालय स्तरावर सुरू आहे त्यामुळे मार्चपर्यंत संपुर्ण खर्चाचे नियोजन महिला व बालकल्याण विभागामार्फत केले असले तरी निधी वेळेत खर्च होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.