होमपेज › Satara › साकुर्डीत वृद्धेचा गॅस्ट्रोने मृत्यू

साकुर्डीत वृद्धेचा गॅस्ट्रोने मृत्यू

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:31PMकराड : प्रतिनिधी 

आठवडाभरापासून गॅस्ट्रोशी झुंज देणार्‍या वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथील अनुसया निवृत्ती कणसे (वय 90) या वृद्ध महिलेचा शुक्रवारी रात्री कृष्णा रुग्णालयात मृत्यू झाला. साकुर्डीतील दूषित पाण्याने पहिला बळी घेतला असून, कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथे दूषित पाण्यामुळे गेल्या आठवड्यात सुमारे 260 हून अधिकजणांना गॅस्ट्रोसद‍ृश साथीची लागण झाली होती. त्यांपैकी 117 जणांवर गावात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. तर उर्वरित 144 जणांवर कराडच्या सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह कराडमधील खासगी रुग्णालये, कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी एक अनुसया कणसे यांना 13 मे रोजी कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्यावर वस्ती साकुर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजूनही नऊ रुग्णांवर उपचार सुरूच ...

वस्ती साकुर्डीतील 144 जणांपैकी कराडमधील सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर कृष्णा रुग्णालयातही दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.