Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Satara › येपणे येथे महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला

येपणे येथे महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:08PMउंडाळे : प्रतिनिधी 

येणपे (ता. कराड) येथे एका महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची संशय व्यक्‍त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, येणपे येथे पती-पत्नी सोमवार दि. 27 रोजी शेतात गेले होते. शेतातील काम आटोपल्यानंतर पतीने पत्नीला तु पुढे जा असे सांगून पत्नीला घराकडे पाठविले. मात्र, रात्री उशीरापर्यंत पत्नी घरी पोहचली नसल्याने पतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शोध घेऊनही ती सापडली नाही. दरम्यान, मंगळवारी दुपारी संबंधित महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत शेतातील झुडपात आढळून आला. याची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संबंधित महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर संशय व्यक्‍त केला असून एकाला रात्री उशीरा ताब्यात घेतल्याचे समजते. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना  सुचना केल्या आहेत.