Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Satara › खळे बंधारा पूर्ण करण्याची मागणी

खळे बंधारा पूर्ण करण्याची मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तळमावले : वार्ताहर

खळे (ता. पाटण) येथील वांंग नदीवरील अपूर्ण अवस्थेतील बंधार्‍याचा श्रेयवाद म्हणजे खळे बंधारा आणि श्रेयवाद हे जणू सुत्रच बनले होते. बंधार्‍याचे गेल्या नऊ वर्षापासून काम बंद अवस्थेत होते. ते जानेवारी महिन्यामध्ये निधी उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा सुरु झाले. मात्र  काही दिवसातच संबंधित ठेकेदाराने थोडे काम करून पुन्हा काम बंद ठेवले आहे. तरी संबंधित ठेकेदाराने काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

गेली नऊ वर्षे बंधारा पूर्ण होण्याची वाट पाहात होता. या नऊ वर्षामध्ये बंधारा पूर्ण व्हावा म्हणून दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर निधीही मंजूर झाला. आ. शंभूराज देसाई यांनी बंधार्‍याच्या ठिकाणी जाऊन पूजन केले. आणि या बंधार्‍याचे काम घेतलेल्या ठेकेदारास बंधारा तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनंतर आ. शंभुराज गट आणि राष्ट्रवादी असा श्रेयवाद सुरु झाला. या बंधार्‍यास हा श्रेयवाद काय नवीन नव्हता. या बंधार्‍याच्या कामास पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हापासून हा श्रेयवाद सुरु होता. 

आता पावसाळा सुरु होण्यासाठी अडीच महिने राहिले आहेत. पाऊस सुरु झाल्यावर काम करणे शक्य होणार नाही.  हा बंधारा पुन्हा श्रेयवादामध्ये अडकतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. आ शंंभूराज देसाई यांनी संबंधित ठेकेदारास बंधारा वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तरी त्या आदेशानुसार ठेकेदाराने कोणतेही कारण न सांगता कामास सुरुवात करणे गरजेचे आहे. सामान्य शेतकर्‍याची एवढीच अपेक्षा आहे की बंधारा लवकर पूर्ण व्हावा. या बंधार्‍याचा लाभ मालदन व मालदन गावाच्या अंतर्गत येणार्‍या वाड्या, खळे, खळे अंतर्गत येणार्‍या वाड्या, गुढे, शिबेवाडी, घोटील गावठाण, तळमावले तसेच बंधार्‍या खालील गावांना होणार आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यातही नदीमध्ये पाणी राहणार आहे. तरी संबंधित ठेकेदाराने बंधारा वेळेत पूर्ण न केल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या बंधार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या शेताला पाणी मिळेल. दरवर्षी उन्हाळ्यात होणार्‍या पाण्याची गैरसोय दूर होईल. 

तरी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदारास सुचना करणे गरजेचे आहे. वेेळप्रसंंगी कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला. या म्हणीप्रमाणे अवस्था होणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. 

Tags : 


  •