Mon, Jun 24, 2019 21:45होमपेज › Satara › हल्लाबोलमधून प्रतिउत्तर मिळणार का? 

हल्लाबोलमधून प्रतिउत्तर मिळणार का? 

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 10:35PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य नागरीकांना कसा बसत आहे हे सांगण्याबरोरच ‘अच्छे दिन’ म्हणजे सर्व सामान्य जनतेची पिळवणूक असून या नाकर्ते सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाने पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरशः ढवळून निघाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री यांनी भाजप मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केलेली टिका राष्ट्रवादीचे नेते यांच्या जिव्हारी लागल्याने आज उंब्रज येथे होणा-या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते काय बोलणार ? भाजपचा कसा समाचार घेणार ? याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

सध्या हल्लाबोलच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. तर त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपचे मंत्री महोदय तितकेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे. भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी 2014 च्या निवडणुकीत ‘तुम्ही चहावाल्याच्या नादाला लागला आणि तुमची धुळधाण झाली, पुन्हा चहावाल्याच्या नादाला लागला तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नाही’ असा थेट गर्भित इशारा राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनाच दिल्याने सदरची टिका राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यांच्या जिव्हारी लागली आहे. तसेच भाजपचे अमित शहा यांनी अजितदादा पवार व सुनील तटकरे यांच्यावर साधलेला निशाना त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी भाजपवर आपला निशाना साधला आहे. 

तसेच महसूल मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या बाजूला दोन कोठडया शिल्लक असल्याचा केलेल्या उल्लेखाने राष्ट्रवादीचे नेते अधिक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या सातारा जिल्हयातील सातारा, पाटण, उंब्रज आणि वाई येथे होत असलेल्या हल्लाबोल सभेकडे जनतेचे लक्ष लागले असून, सत्ताधारी यांना राष्ट्रवादीचे नेते कसे फटकारणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून उंब्रज येथे हल्लाबोलची सभा होत असून, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हल्लाबोलच्या निमित्ताने प्रथमच उंब्रजला येत असून, नेमका कोणावर व कसा तीर साधला जाणार हे आजच्या हल्लाबोल मधून स्पष्ट होणार आहे.