Thu, Aug 22, 2019 11:00होमपेज › Satara › फलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

फलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

Published On: Dec 09 2017 1:16PM | Last Updated: Dec 09 2017 1:16PM

बुकमार्क करा

फलटण :  प्रतिनिधी 

फलटण शहरासह तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे.  वाघ, तरस यांनी धुमाकूळ घातल्यानंतर शनिवारी कोल्ह्याने दोघांवर हल्ला केला. 

लक्ष्मण घाडगे रा.कोराळे बीबी व गंगाराम गंगाराम कोळपे रा.कोळपे वस्ती बीबी ता.फलटण  यांच्यावर हल्ला चढवला. यापूर्वी तरसाने फरांदवाडी येथे एका शेळीवर हल्ला केला होता. तर फलटणमध्ये गेल्या काही  दिवसापासून वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून चिंता व्यक्त केली जात आहे.