Thu, Jun 20, 2019 20:45होमपेज › Satara › पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 11:04PMकराड : प्रतिनिधी

घरगुती कारणासह संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या वारुंजी (ता.कराड) येथील आप्पासोा सुरेश धुमाळ या पतीला कराडच्या अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या. सी. पी. गड्डम यांनी ही शिक्षा सुनावली असून सरकार पक्षाकडून अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली.

आशा धुमाळ असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून ही घटना 10 डिसेंबर 2014 रोजी वारुंजीतील धोंडवळ नावाच्या शिवारात घडली होती. आप्पासो धुमाळ याने आशा धुमाळ यांचा गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते.

न्या. गड्डम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज होऊन गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. कुलकर्णी यांनी 26 साक्षीदार तपासले. यात पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, संशयित धुमाळ यांची मुलगी मोहिनी धुमाळ, दोन प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. 

 

Tags : karad, karad news, crime, Wife murder case, Life imprisonment,