Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Satara › सातारा: पर्यटनासाठी आलेल्या प. बंगालच्या युवतीचा विनयभंग

सातारा: पर्यटनासाठी आलेल्या प. बंगालच्या युवतीचा विनयभंग

Published On: Apr 27 2018 7:56PM | Last Updated: Apr 27 2018 7:56PMसातारा : प्रतिनिधी

पश्‍चिम बंगालमधून पर्यटनासाठी सातार्‍यात आलेल्या युवतीचा बारामोटेची विहीर, ता. लिंब येथे अनोळखी तीन ते चार युवकांनी रस्ता दाखवण्याचा बहाणा करुन विनयभंग केला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संशयितांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी पश्‍चिम बंगाल राज्यातील 24 वर्षीय युवती सातारा येथे पर्यटनासाठी आली असून ती सध्या सातारामधील एका हॉटेलमध्ये थांबलेली आहे. लिंब ता. सातारा येथील बारामोटेची विहिर हे प्रसिध्द ठिकाण असल्याने ती युवती दि. 26 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेथे गेली होती. बारामोटेची विहीर पाहत असताना ती युवती कॅमेर्‍याद्वारे फोटो काढत होती. याचवेळी काही अनोळखी युवक आले व त्यांनी युवतीचा कॅमेरा घेऊन फोटो काढायचे असल्याचे सांगितले. युवकांनी कॅमेरा घेतल्यानंतर तो कॅमेरा परत त्या युवतीला दिला.

कॅमेरा घेऊन ती युवती तेथून बाहेर पडली व चालत निघाली. युवती चालत असतानाच संशयित युवकांनी दुचाकीवरुन त्या युवतीचा पाठलाग केला. संशयित युवकांनी त्या युवतीला रस्ता दाखवतो, असे सांगून मुख्य रस्त्यावरुन न नेता आड रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या युवतीचा लक्षात ही बाब  आल्यानंतर तिने स्वत: सुटका करुन घेतली. अशाप्रकारे पाठलाग करुन आड रस्त्याला नेण्याचा प्रयत्न करत विनयभंग झाल्याने त्या युवतीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अनोळखी युवकांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र परप्रांतीय युवतीची छेड काढली गेल्याने युवती व महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tagas : West Bengal Girl,  Molestation Case, Crime Unknown Person,Satara