Sat, Jan 19, 2019 19:51होमपेज › Satara › काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे वडूज येथे जल्लोषात स्वागत (व्हिडिओ)

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे वडूज येथे जल्लोषात स्वागत(व्हिडिओ)

Published On: Sep 03 2018 6:35PM | Last Updated: Sep 03 2018 6:35PMवडूज : वार्ताहर

केंद्र आणि राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढली जात आहे.  या जनसंघर्ष यात्रेचे सोमवारी वडूज शहरात ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. 
ही जनसंघर्ष यात्रेची रॅली कुरोली फाटा येथून सुरू करण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे यांची  प्रमुख उपस्थिती होती. 

रॅली शहरातील मुख्य चौकात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा बांधवांनी मराठा समाज बांधवाना आरक्षण मिळावे तसेच आरक्षणाबाबत काँग्रेसने आग्रही भूमिका घ्यावी, याबाबतचे लेखी निवेदन दिले तर, मुख्य चौकात भाजप सरकारच्या विरोधातील भ्रष्टाचार सरकार असे उल्लेख केलेली दहीहंडी आ. हर्षवर्धन पाटील यांनी फोडली. यानंतर ही रॅली शहरातील हुतात्मा स्मारकात नेण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. 

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अशोक गोडसे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विवेक देशमुख, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण,  नगरसेवक डॉ. महेश गुरव, श्रीकांत उर्फ काका बनसोडे, सोमनाथ जाधव, हणमंत बोटे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.