Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Satara › पुढील नाट्यसंमेलन महाबळेश्‍वर येथे होण्यासाठी आम्ही आग्रही : बावळेकर

पुढील नाट्यसंमेलन महाबळेश्‍वर येथे होण्यासाठी आम्ही आग्रही : बावळेकर

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 10:24PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

मुंबई येथील मुलुंड येथे 98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झाल्यानंतर आता 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाबळेश्‍वर येथे भरवण्याची तयारी येथील नाट्य परिषदेच्या शाखेने केली आहे. तसा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडे दिला असल्याची माहिती येथील नाटय परिषदेचे शाखा अध्यक्ष डी. एम.बावळेकर यांनी दिली. 

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुका पार पडल्या नंतर नविन पदाधिकारी यांनी परिषदेचा कार्यभार स्वीकारला होता. 98 व्या नाटय संमेलन महाबळेश्‍वर येथे भरविण्यात यावे, असा प्रस्ताव दिला होता. मात्र  98 वे संमेलन मुंबई येथे घेण्यात आले.या संमेलनासाठी महाबळेश्‍वर शाखेचे अध्यक्ष डी.एम.बावळेकर, कार्यवाह संजय दस्तुरे, कोषाध्यक्ष विलास काळे व कार्यकारिणी सदस्य अभिजीत खुरासणे उपस्थित होते. 

संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी परिषदेचे पदाधिकारी व शाखेच्या पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला महाबळेश्‍वर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नाटय संमेलन महाबळेश्‍वर येथे भरविण्याची मागणीचा प्रस्ताव प्रसाद कांबळी यांना दिला. यावेळी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.गिरीश ओक, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, नियामक मंडळाचे सांगली येथील प्रतिनिधी श्रीनिवास जरंडीकर , मुकुंद पटवर्धन व संदीप पाटील तसेच कोल्हापूरचे गिरीश महाजन आदी प्रमुख उपस्थित होते.