Tue, Aug 20, 2019 04:07



होमपेज › Satara › वारंवारचा दुष्काळ कायमचा हटवून इतिहास घडवा : आ. शशिकांत शिंदे

वारंवारचा दुष्काळ कायमचा हटवून इतिहास घडवा : आ. शशिकांत शिंदे

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 8:22PM



कोरेगाव : प्रतिनिधी 

वॉटरकप स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील गावाचा राज्यात  प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वच गावांनी  प्रयत्न करावा. यानिमित्ताने दुष्काळ कायमचा हटवून इतिहास घडवावा,  असे आवाहन माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदे यांनी केले.

वॉटरकप स्पर्धा 2018 मध्ये सहभागी झालेल्या गावांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने अर्थ सहाशय्य करण्यात आले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ.शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी आ.बाळासाहेब पाटील, आ.दीपक चव्हाण, जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालिका सुरेखा पाटील, प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती. वॉटरकपसाठी अभिनेते अमीर खान यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून आ. शिंदे म्हणाले, वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलक्रांतीचे तुफान आले आहे. 

यामुळे अनेक गावं दुष्काळाच्या  दुष्ट चक्रातून बाहेर पडत आहेत. आपली   इतकी जिद्द हवी आहे की, कायमस्वरूपी आपल्या गावातून दुष्काळ हटवून इतिहास घडवायचा आहे. 2018 च्या वॉटर कप स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील अनेक गाव उतरली आहेत याचे आपणास मोठे कौतुक आहे. या स्पर्धत कोरेगावचा राज्यात प्रथम क्रमांक आल्यास मला मोठा आनंद होईल.

संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, भाऊ बंदकी, राजकीय हेवेदावे विसरून वॉटर कपच्या माध्यमातून श्रमदान करण्यासाठी  पुढे येत आहेत. हे शरद पवारांनी पहिल्यानंतर त्यांनी तत्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला  आहे.

सुनील माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे,उपसभापती संजय साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रताप कुमुकले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, पंचायत समिती सदस्य साधना बनकर, डॉ.होळ, बँकेचे व्यवस्थापक , कर्मचारी वृंद उपस्थित होते.