Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Satara › कोयना धरणाचे दरवाजे ७ फुटांवर

कोयना धरणाचे दरवाजे ७ फुटांवर

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 12:09AMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस व धरणाची साठवण क्षमता लक्षात घेऊन कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे सोमवारी सहा  फुटांवरून सात फूट उचलण्यात आले. या दरवाजांतून विनावापर 30,555 क्युसेक व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 असे एकूण 32,455 क्युसेक पाणी सध्या प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. या 

पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाली आहे. पूर्वेकडील गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात आता एकूण 84.10 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 
कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या सर्वच ठिकाणी सध्या कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. धरणात 84.10 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. प्रतिसेकंद सरासरी 32183 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. शिवाय येत्या आठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाच्या शक्यता हवामान खात्याने वर्तविल्या आहेत. त्यामुळे धरणात सध्याचा पाणीसाठा व शिल्लक राहिलेली पाणी साठवण क्षमता याचा विचार करून सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे सहा फुटावरून सात फूटावर करण्यात आले. 

कोयना धरणात यावर्षी झालेल्या पावसात आत्तापर्यंत तब्बल 70.34 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर दि. 17 जुलैपासून पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात धरण दरवाजातून विनावापर 7.67 टीएमसी व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1.01 असे एकूण 8.68 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणात आता एकूण 84.10 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापैकी उपयुक्त साठा 79 10 टीएमसी , पाणीउंची 2145.9 फूट, जलपातळी 654.025 मीटर इतकी झाली आहे.