Fri, Jul 19, 2019 19:54होमपेज › Satara › शासकीय अधिकार्‍यांकडून पाहणी करून समाधान व्यक्‍त 

बनवडीचे सांडपाणी व्यवस्थापन आदर्शवत

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 9:23PM

बुकमार्क करा

कोपर्डे हवेली : वार्ताहर

घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन हा आज सर्व ग्रामपंचायतीपुढे असलेला एक गंभीर विषय बनला  आहे. वाढत्या नागरीकरणामुळे प्रश्‍न अधिकच रौद्र रूप धारण करत आहे असे ग्रामपंचायती समोर आव्हान  उभे असताना बनवडी ता. कराड  ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे व्यवस्थापन करुन ते पाणी शेतीला पुरवले आहे त्यामुळे बनवडी ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायती समोर आदर्श निर्माण केला आहे.त्याची पाहणी अधिकार्‍यांनी करून समाधान व्यक्‍त केले आहे. 

जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कराडचे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, एम. जी. पी.चे उप अभियंता देशपांडे, आरळेकर यांनी केली.यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शंकरराव खापे, सरपंच उषाताई करांडे, ग्रामविकास अधिकारी एस. टी. लाटे यांनी बनवडीची पाहणी केली. 

बनवडी ग्रामपंचायतीने सांडपाण्याच्या व्यवस्थापनातून शेती पिकवण्याचे ठरवले आहे.सध्या सांडपाण्यातुन शेतीमध्ये केळी,शेवगा,मका आदि पीके घेण्यात आली आहेत.  या शेती लगतच मोठा शोषखड्डा तयार करण्यात आला आहे तो खड्डा भरून जादा झालेले पाणी या शेतामध्ये सोडण्यात येते.तर गावच्या उताराच्या बाजुने शोष खड्डे काढल्याने ते पाणी जमिनीत मुरत आहे. 

जमीनीतील पाणी पातळी वाढत आहे त्यामुळे  विहरीच्या पाणि पातळीत वाढ झाली आहे.त्याचा उपयोग शेतीच्या पाण्यासाठी होत आहे.त्यामुळे वाया  जाणार्‍या पाणी प्रदूषणाचा प्रश्‍न मिटला आहे.तर या पाण्यातुन शेती फुलवली असुन ग्रामपंचायतीचे उत्पादन