Wed, Sep 19, 2018 13:14होमपेज › Satara › उधारी मागितली म्हणून हॉटेल मालकावर वार ; दोघांना अटक

उधारी मागितली म्हणून हॉटेल मालकावर वार

Published On: Jan 14 2018 10:28AM | Last Updated: Jan 14 2018 10:28AM

बुकमार्क करा
कोरेगाव : प्रतिनिधी

पाडळी (सातारारोड), ता. कोरेगाव येथील जरंडेश्‍वर ढाब्यावर ढाबा मालकाने जुने बिल मागितल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास गोटीचा माळ वाच्या शिवारात दुचाकी अडवून धारधार हत्याराने सपासप वार करुन  दोघांना गंभीर जखमी केले.

याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडळी  ता. कोरेगाव येथील जरंडेश्‍वर ढाब्यावर पार्सल नेण्यासाठी अमर सर्जे राव राक्षे (वय 32) व जितेंद्र मधुकर  पंडीत (वय 36) दोघे रा. पाडळी आले होते. यावेळी ढाबा मालक विशाल रामदास सावंत यांनी पूर्वीच्या  जेवणाचे राहिलेले बिल मागितले. त्यामुळे त्यांच्यात  शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विशाल सावंत व सागर महादेव महाजन हे दोघे दुचाकीवरून घरी पाडळी येथे जात असताना गोटीचा  माळ नावाच्या शिवाराजवळ  दोघा संशयितांनी त्यांची दुचाकी अडवली व दोघांवरही धारधार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे, पो. नि. संभाजी म्हेत्रे, उपनिरीक्षिक बी. एस. सांगळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संशयित अमर राक्षे व जितेंद्र पंडीत ताब्यात घेण्यात आले आहे.