Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Satara › पंधरा ग्रामपंचायतीसाठी २७ रोजी मतदान

पंधरा ग्रामपंचायतीसाठी २७ रोजी मतदान

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

जून ते सप्टेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित झालेल्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच, सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी प्रचंड अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज छाननीनंतर मंगळवारी पार पडलेल्या माघार प्रक्रियेत काहीजणांनी उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामुळे 23 पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. मात्र, निवडणूक लढवणार्‍या इच्छुकांनी अर्ज कायम ठेवल्याने 15 ग्रामपंचायतींसाठी दि. 27 रोजी मतदान होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 408 ग्रामपंचायतींच्या 776 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेत दि. 16 रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघार  घेतल्याने 23 पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरित 15 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे.  776 रिक्त जागांमधील काही जागा बिनविरोध झाल्या.

मात्र, बहुतांश ठिकाणी माघार घेतली न गेल्याने त्याठिकाणी निवडणूक लागली आहे. याठिकाणी   दि. 27 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदार  होणार आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे  त्या जागा पुन्हा रिक्त राहिल्या.  या निवडणुकीनंतर होणार्‍या मतमोजणीचे ठिकाण जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्‍चित करणार आहेत.