Tue, Jun 02, 2020 00:52
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › 'मतदारच विरोधकांना धडा शिकवतील'

'मतदारच विरोधकांना धडा शिकवतील'

Published On: Jan 23 2019 1:06AM | Last Updated: Jan 23 2019 1:06AM
कराड : प्रतिनिधी 

स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. युती शासनातील मंत्री सुद्धा पृथ्वीराज बाबांवर टीका करताना दहावेळा विचार करून बोलतात.मात्र मलकापूरच्या निवडणुकीत कोणीतरी उठतो आणि बाबांवर हिन पातळीवर टीका करतो. यातून टीका करणारांच्या संस्कारांचे दर्शन होते. मलकापूरमधील जनता सूज्ञ असून विरोधकांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी यांनी दिला. 

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. रयत कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस अजित पाटील- चिखलीकर,  जयवंत जगताप, काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलम येडगे, धनाजी काटकर, हिंदुराव पाटील, झाकीर पठाण, पै. नाना पाटील, विद्याताई थोरवडे, नामदेव पाटील, आदील मोमीन, अ‍ॅड. विकास पाटील, प्रताप साळुंखे, अविनाश नलवडे यांची उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे 2013 च्या निवडणुकीला सतरा-शून्य असा निकाल दिला, त्या प्रमाणे या निवडणुकीमध्ये 20-0 असा निकाल द्या.  शहरासाठी निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेतो. भाजप सरकारमुळे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले. भाजपला जनता कंटाळली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे.उदयसिंह पाटील म्हणाले,आज अखेर काँग्रेसच्या आणि रयतच्या विचार धारेवर एक निष्ठेने काम करत आहे. सर्वसामान्यांना  बरोबर घेऊन जाण्याची काँग्रेसची परंपरा आहे. मनोहर शिंदे यांनी शहरात राबवलेली विकासाची कल्पना देशात अव्वल ठरली आहे. विरोधकांनी  मलकापूरचा काय विकास केला? मतदारांनी विकासाच्या व काँग्रेसच्या पाठीशी उभे रहावे. आनंदराव सुतार यांनी प्रास्ताविक केले.विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.