Wed, Jun 26, 2019 17:42होमपेज › Satara › सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा   

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा   

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 8:57PMकराड : प्रतिनिधी

मतदार हा लोकशाहीचा आत्मा आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करण्याबरोबर मतदानाचा हक्क बजावणे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केले. 

राष्ट्रीय मतदार दिवस कराड तहसील कार्यालयाकडून साजरा करण्यात आला. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेंद्र शेळके होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, निवडणूक नायब तहसीलदार बी. बी. चौगुले, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.  हिम्मत खराडे म्हणाले, 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व युवक युवतींनी मतदार नोंदणी करावी. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करावे. कोणत्याची प्रलोभनाला बळी पडू नये. 

नवनाथ ढवळे म्हणाले, लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अजिंक्य शेवाळे यांनी केले. स्वागत बी. बी. चौगुले यांनी केले. आभार नारायण वाघमारे यांनी मानले. प्रारंभी तहसील कार्यालय ते यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन या दरम्यान जागृती रॅली काढण्यात आली.

यामध्ये टिळक हायस्कूल, विठामाता कनिष्ठ महाविद्यालय, यशवंत हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदार यादीत नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान ओळखत्राचे वाटप करण्यात आले. तसेच जानेवारी 2000 रोजी जन्मलेल्या व एक जानेवारी 2018 रोजी आठरा वर्षे पूर्ण झालेल्या सहस्त्रक मतदारांचा बॅच देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामकाज केलेल्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमास निवडणूक शाखेचे कर्मचारी लिपिक नारायण वाघमारे, सुनीता सुरवसे, शिवराज माळी, जयंत कांबळे, नागरिक यावेळी उपस्थित होते.