Mon, Nov 19, 2018 05:13होमपेज › Satara › जवान विश्‍वनाथ साळुंखे अनंतात विलीन

जवान विश्‍वनाथ साळुंखे अनंतात विलीन

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:28PM

बुकमार्क करा
खटाव : प्रतिनिधी 

सुकना (आसाम) येथे देशसेवा बजावत असताना जवान विश्‍वनाथ हिंदूराव साळुंखे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना विसापूर येथे शासकीय इतमामात बुधवारी सकाळी 10 वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. 

विसापूर ता. खटाव येथील विश्‍वनाथ हिंदूराव साळुंखे हे 2000 मध्ये भारतीय सैन्य दलात सहभागी झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विसापूर, माध्यमिक शिक्षण श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. जवान विश्‍वनाथ साळुंखे गेली 17 वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. विश्‍वनाथ साळुंखे हे 110 इंजिनिअरींग रिजीमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. आसाम सुकना येथे त्यांचे पोस्टींग होते. शनिवार दि. 30 रोजी त्यांचा अपघातामध्ये दुर्देवी मृत्यु झाला. त्यांचे पार्थिव कोलकत्ता येथून विसापूर येथे बुधवारी सकाळी 8 वाजता आले.  त्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक भुजंगराव शिंदे, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, अ‍ॅड. विजयराव साळुंखे, सरपंच सागरभाऊ साळुंखे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पं. स. सदस्य संतोष साळुंखे, नायब तहसीलदार सुर्यकांत कापडे, सपोनि संभाजी गायकवाड,राहुल पाटील, चेअरमन राजेंद्र साळुंखे, माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे, बाळासाहेब सावंत, हरि सावंत,  बॉम्बे इंजिनिअरींग युनिटचे जवान, सातारा सैनिक बोर्डचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली. 

विसापूरचे माजी उपसरपंच हिंदूराव धोंडिबा साळुंखे यांचे जवान विश्‍वनाथ हे सुपुत्र होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, बहिण व वहिनी असा परिवार आहे.