Wed, Jul 17, 2019 18:41होमपेज › Satara › शाळा बंदमुळे ‘राईट टू लर्न’चे उल्‍लंघन

शाळा बंदमुळे ‘राईट टू लर्न’चे उल्‍लंघन

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:55PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पटसंख्येअभावी जिल्ह्यातील 72 शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्‍कावर गदा येणार असून राईट टू लर्निंगचे उल्‍लंघन होत असल्याचा आरोप विविध संघटनांमधून होऊ लागला आहे. 

जिल्ह्यातील ज्या 72 शाळा बंद होणार असून त्यामध्ये जावली व पाटण तालुक्यातील जास्त शाळांचा समावेश आहे. पटसंख्येच्या निकषावर या शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे.  शिक्षण विभागाचे हे धोरण अत्यंत चुकीचे असून  घटनेने दिलेले मूलभूत अधिकार तसेच शिक्षण हक्काचा भंग होत आहे. मूलभूत अधिकाराचा भंग झाल्यास, मुलांना शिक्षण नाकारल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यातील 72 शाळा बंद करण्यात येणार असून या शाळांतील  विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. बंद करण्यात येणार्‍या शाळा व कंसामध्ये समाविष्ट केल्या जाणार्‍या गावांची नावे पुढीलप्रमाणे- महाबळेश्‍वर तालुक्यातील पारूट नं. 2 (मांघर), आरव (वळवण), कासरूंड (शिरवली), वेंगळे  (खांबील पोकळे), गाढवली (गावडोशी), वानवली अहिरे (वानवली उत्तेकर), आळवण (पाली आठेगाव), दाभेमोहन (दाभे), शिंदी (आरव), घावरी (विवर), रेनोशी (गावडोशी), सालोशी (लामज), कळमगाव (कळमगाव), भेकवली( शिंदोला) मालुसर नं. 1 (मालूसर), पांगरी (भिलार), धावली (उंबरी), वाघाळे (वाघाळे), वारसोलीदेव (कोळी), देवसरे (कुरोशी), पोकले (खांबील चोरगे), उचाट (वाघावळे), चतुरबेट (दूधगाव), सातारा तालुक्यातील भीमनगर (तळदेव).

जावली तालुक्यातील वाकी (रामेघर), गेळदरे (कुसुंबीमुरा), खंडाळा तालुक्यातील रामनगर (बावडा), पानसरेवस्ती (पिसाळवाडी), भोसलेवाडी (घाटदरे). फलटण फिरंगेवस्ती वडले (वडले), शिरवली तरडगाव (तरडगाव), कराड तालुक्यातील  कळसेवस्ती (रेठरे खुर्द), भोसलेवाडी (भोसलेनगर), दुधडेवाडी (घराळवाडी), शेरे पाटी (थोरात मळा), शेवाळेवाडी टाळगाव (शेवाळेवाडी उंडाळे), भुयाचीवाडी जुनी (भुयाचीवाडी नवी). पाटण  तालुक्यातील काळेवाडी (काळेवाडी आडूळ), महाडिकवाडी (नुने), डाकेवाडी (वाझोली). वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी  (चिखली), दत्तनगर (जोर), गोंजारवाडी (आसरे), नांदगणी (नांदगणी), गोळेवाडी (गोळेवाडी), मोर्णेवाडा (मोर्णेवाडा), मुगाव (मोर्जीवाडा), वडाचीवाडी (अभेपुरी), किसनवीरनगर (जांब), सोमेश्‍वरवाडी(वेरूळी), कोचळेवाडी (मांढरदेव). 

माण तालुक्यातील खुडुकदरा घोडेवाडी (घोडेवाडी वारूगड), लावंडवस्ती सोकासन (कदमवस्ती सोकासन), डंगिरेवाडी मोही (डंगिरेवाडी थदाळे), तेलदरा (तेलदरा भांडवली), खिंडमळा (पाटीलवस्ती जायगाव), मुळीकवाडी (शिवाजीनगर, दहिवडी), खिंडवाडी (पानवण), पानाडेवाडी (कोरेवाडी), बागलवाडी (आटपाडकर वस्ती), घुटुकडेवस्ती (कुकुडवाड) काळंगे गोठा (धोतरेवस्ती). कोरेगाव तालुक्यातील भांडेवाडी (देउर), काळोशी (दुर्गळवाडी), भंडारमाची (उमाजीनगर), खामकरवाडी  (अंबवडे सं.वाघोली), शहापूर (अनपटवाडी), गणेशवाडी (मध्वापूरवाडी), मोरबेंद (रणदुल्लाबाद) या शाळांचा समावेश आहे.