Tue, Jul 23, 2019 17:01होमपेज › Satara › उंडाळकरांना काँग्रेसमध्ये घ्या, तेच आमदार होणार : जयवंतराव आवळे 

उंडाळकरांना काँग्रेसमध्ये घ्या, तेच आमदार होणार : जयवंतराव आवळे 

Published On: Dec 10 2017 6:17PM | Last Updated: Dec 10 2017 6:20PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी 1980 पासून 2014 पर्यंत  सलग सातवेळा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र 2014 साली आमच्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसवरील निष्ठा कायम ठेवली आहे. आता त्यांना कराड दक्षिणमध्ये तोड नाही. तेच आता पुन्हा आमदार होणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे आता तुम्ही विलासराव पाटील - उंडाळकर यांच्यावरील अन्याय दूर करा, असे आवाहन माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांना केले.

कराडमध्ये माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचा त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सव, 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डाँ. भारत पाटणकर, माजी आमदार उल्हासराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आवळे म्हणाले, उंडाळकर काका हेच कराड दक्षिणचे सतपाल वस्ताद आहेत. त्यांना आता तोडच नाही. मतदारसंघात कोणी त्यांच्या बरोबरीचा नाही. त्यामुळे तुम्ही त्यांचा हात धरून काँग्रेसमध्ये घेऊन जा, अशी आग्रही भूमिकाही आवळे यांनी यावेळी मांडली.