Sun, Mar 24, 2019 04:47होमपेज › Satara › उंडाळकर यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय मान्य : अशोक चव्हाण

उंडाळकर यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय मान्य : अशोक चव्हाण

Published On: Sep 03 2018 12:27PM | Last Updated: Sep 03 2018 12:27PMकराड : प्रतिनिधी 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटातील टोकाचे मतभेद सर्वश्रूत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना छेडले असता पक्षाच्या बळकटीसाठी कोणतीही गोष्ट करण्यास आपण कधीच मागेपुढे पाहत नाही. मात्र या विषयात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीच पुढाकार घ्यावा. तो जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य असेल असे स्पष्ट करत विलासराव पाटील उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात म्हणून मनोमनलन व्हावे, ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे सूतोवाच खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केले. 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर सोमवारी तिसऱ्या दिवशी जनसंघर्ष यात्रा कराडमधून खटावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वी हॉटेल पंकजमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना खासदार अशोक चव्हाण यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. 

यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर गट आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण गटातील मतभेदांचा  विषय पत्रकारांनी  उपस्थित केला. याबाबत बोलताना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यामुळे कराड दक्षिण जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल. त्यामुळे याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण हेच योग्य तो निर्णय घेतील. त्यांचा निर्णय मान्य नसेल आणि  पृथ्वीराज चव्हाण हे जो तोडगा काढतील तो आपणास मान्य असेल, अशी आपली भूमिका स्पष्ट करत पक्ष बळकटीसाठी प्रसंगी आपण या विषयावर मध्यस्थी करू असे सूतोवाच खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.