Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Satara › देशभक्तीपर धून...वैविध्यपूर्ण चित्ररथ 

देशभक्तीपर धून...वैविध्यपूर्ण चित्ररथ 

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:04PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

विजय दिवस चौकातील विजयस्तंभास  मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील दैदीप्यमान विजया प्रित्यर्थ साजरा करण्यात येणार्‍या विजय दिवस समारोहास शोभायात्रा काढून प्रारंभ झाला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. व्ही. जाधव, डॉ. अशोकराव गुजर, संभाजीराव मोहिते, विनायक विभुते, सौ. विद्या पावसकर, सलीम मुजावर, कॅप्टन शंकरराव डांगे, रत्नाकर शानभाग, गणपतराव कणसे, भरत कदम, रमेश जाधव यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

देशभक्तीपर गीतांची धून, विविध विषयांवरील चित्ररथ व शेकडो विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागाने ही शोभायात्रा लक्षवेधक ठरली. या शोभायात्रेत पोदार इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी  त्यानंतर विविध विषयावरील चित्ररथ होते. शोभायात्रेत साईबाबा व राजर्षि शाहू महाराज, संत गाडगे महाराज यांची वेषभूषा केलेले कलाकार लक्षवेधून घेत होते. तसेच या शोभायात्रेत स्केटिंगपट्टू, लेझीम खेळणार्‍या फेटाधारी विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या.

चित्ररथामध्ये होले फॅमिली स्कूलने पर्यावरण, यशवंत हायस्कूने सर्वधर्म समभाव, विठामाता विद्यालयाने सर्वधर्म सहिष्णुता, या विषयावर चित्ररथ केले होते. हे सर्व चित्ररथ लक्षवेधी ठरले. तर प्रेमलाताई चव्हाण धर्नुविद्या अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला चित्ररथ हा महत्वपूर्ण होता. तर महाराष्ट्राची विविधता यावर विषयावर साकारलेल्या संत तुकाराम हायस्कूलचा चित्ररथ पाहण्यासारखा होता. बॅण्डवर देशभक्तीपर गीते सादर केली जात असल्याने व विद्यार्थी देत असलेल्या देशभक्तीपर घोषणांमुळे शहरात एक प्रकारचे देशभक्तीमय वातावरण तयार झाले होते.