Tue, Apr 23, 2019 06:31होमपेज › Satara › गरिबांना सुविधाच मिळत नाही

गरिबांना सुविधाच मिळत नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

जिल्हा प्रशासनाकडून सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात प्रशासनाने गोरगरिबांना सोयी- सुविधा उपलब्ध देण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, आजवर केवळ आश्‍वासनच मिळाले आहे. त्यामुळे आपण गतीने कार्यवाही करण्यासाठी लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मनोज माळी यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी तीन महिन्यांपूर्वी सर्वप्रथम सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींमुळे कराड- पाटण तालुक्यातील गरिबांना होणारा त्रास, प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर गेल्या महिन्यातही पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही आजवर केवळ आमरण उपोषणानंतर लेखी आश्‍वासन देण्यात आले आहे, असे म्हणणे माळी यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले.

उपजिल्हा रूग्णालय 200 बेडचे करण्यासाठी राज्य शासनाने भरीव निधी द्यावा, बंद असलेली सीटी स्कॅन मशीन त्वरित कार्यान्वित करण्यात यावी, ट्रामा केअर युनिट उपजिल्हा रूग्णालयात सुरू करणे आवश्यक असून त्याबाबत शासनाकडून त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशा विविध मागण्या माळी यांनी केल्या.

तसेच, रूग्णालयात साधे पिण्याचे पाणी मिळत नसल्याकडे माळी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय भूलतज्ञ, अस्थिरोग तज्ञ ही पदे रिक्त आहेत. फिजीशियन पद रिक्त असल्याने आयसीयु विभागही बंद आहे. बर्नवॉर्डही कर्मचार्‍यांअभावी बंद आहे. त्यामुळेच कराड आणि पाटण तालुक्यातील गोरगरिब रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात जावे लागते, असेही माळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.