होमपेज › Satara › देशमुखनगरमधील दारूविक्रेत्या तडीपार महिलेला अटक

देशमुखनगरमधील दारूविक्रेत्या तडीपार महिलेला अटक

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:58PMवेणेगाव : वार्ताहर 

देशमुखनगर, ता. सातारा येथील आठ तालुक्यांतून हद्दपार करण्यात आलेली शकिला गुलाब मुलाणी  (वय 50) हिने तडीपार आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिला अटक केली. 
दारूविक्रीप्रकरणी  नुकतेच शकीला  व तिच्या दोन्ही मुलांना तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीची कारवाई असतानाही शुक्रवारी शकीला देशमुखनगरमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना पाहताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महिला पोलिसांनी थरारक पाठलाग करून तिला पकडले. शकीलाला पकडल्यानंतर तिच्यावर तडीपारी आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शकीला मुलाणी हिला सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा, जावली, पाटण, कराड तालुक्यांतील हद्दीतून 19 जानेवारीपासून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार बाळू पवार, किरण निकम, राजू शिखरे, समाधान राक्षे, मनोहर सुर्वे, चेतन बगाडे, सुनीता कुदळे, रूपाली बनसोडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.