Thu, Apr 25, 2019 23:49होमपेज › Satara › वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने पुस्तकांच्या गावी विविध कार्यक्रम

वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने पुस्तकांच्या गावी विविध कार्यक्रम

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:01PMभिलार : वार्ताहर

भारतातील पहिले पुस्तकांचं गाव भिलार या अभिनव प्रकल्पास  वर्ष पूर्ण आहे. या निमित्ताने शुक्रवार दि.  4 मे रोजी शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खुल्या प्रेक्षागृहाचे उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी पत्रकाद्वारे दिली.या सोहळ्यात याशिवाय नव्या 5 दालनांचे (पुस्तक घरांचे) उदघाटन, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनेक साहित्यिक, कलाकारांची प्रकल्पास भेट असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे 

दुपारी 12  वाजता खुल्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व ना. विनोद तावडे, आ. मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे, सरपंच वंदना भिलारे, उपसरपंच अनिल भिलारे यांच्या उपस्थितीत होणार आहे. श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायं. 5 वा. शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक - साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा (दालन 1), नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तक, कादंबरी (दालन 2) व चरित्रे - आत्मचरित्रे (दालन 2 ) अशा नव्या 5  दालनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, श्रीम. मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्‍वास कुरुंदकर, किशोर पाठक,  विनायक रानडे आदी पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत.

 Tags : Satara, Various, programs, book, vilege, occasion, year