Thu, Jul 18, 2019 08:58होमपेज › Satara › दहा भाविकांसह सुरू झालेली वाल्मिकीची दिंडी

दहा भाविकांसह सुरू झालेली वाल्मिकीची दिंडी

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:07PMसणबूर : तुषार देशमुख 

नाम घेता वाट चाले। यज्ञ पाऊला पाऊली। गात जागा गात जागा। प्रेम मागा विठ्ठला॥ पुराण प्रसिद्ध बोलीले वाल्मिक। नामे तिन्ही लोक उध्दारती॥

1998 साली श्री ह.भ.प. निवास मोंडे लोटांगणे महाराज अंबवडे खुर्द, ता. पाटण यांच्या प्रेरणेतून श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा अवघ्या दहा भाविकांना घेवून सुरू झाला होता. या दिंडीत सुरूवातीला अंबवडे खुर्द, मानेवाडी, कोळेवाडी येथील भावीक सहभागी झाले होते. वाल्मिक ते पंढरपुर पहीली वारी ह.भ.प. निवास मोंढे महाराज यांनी लोटांगण घेत पूर्ण केली. पुढे विभागाच्या कानाकोपर्यातून हळूहळ भाविक सहभागी होऊ लागले. 

सध्या या वारी मध्ये अंबवडे खुर्द, ढेबेवाडी, मानेवाडी, कोळेवाडी, घारेवाडी, चचेगांव, करवडी,  मायणी( पवारमळा), गलमेवाडी, बनगरवाडी, ओगलेवाडी, रायगांव येथून तिनशे भाविक सहभागी होतात. यामध्ये दिडशेवर महिला व काही प्रमाणात मुली सहभागी होतात तर तरूणांसह वृद्ध भाविकदेखील वारीमध्ये सहभागी होत असतात. वाल्मिक ऋषीच्या पादुका पालखीत ठेऊन वाल्मिक पठारावरील वाल्मिक ऋषींच्या मंदिरातून वारीला सुरुवात होते. वारीचा पहिला मुक्काम अंबवडे खुर्द येथे केला जातो. भाविकांच्या मते वाल्मिक ते सरसवाडी पर्यंत वैद्यकीय सेवा मिळत नाही. चालून- चालुन अंगदुखी, कणकणी,  ताप थंडी आदी शारिरीक त्रास होतो.

अशावेळी स्वत:जवळची औषधे घेऊन किरकोळ पध्दतीचे उपचार करून मार्गक्रमण करावे लागते. सरसवाडी ते दिघंचीपर्यंतचा तिस कि.मी. चा टप्पा फार ेमोठा आहे याला रडवा माळ म्हणतात. येथे स्वच्छतागृहाची सोय नसते. तेथून पुढे माऊलींचा गजर करीत पंढरपुर मध्ये पोहोचल्यावर चंद्रभागेमध्ये ऋषींच्या पादुकांना स्नान घालून नगर प्रदक्षिणा घातली जाते.नंतर अभिषेक करून भक्‍तीपूर्ण वातावरणात वारीेची समाप्ती केली जाते.