Tue, Jun 02, 2020 23:07होमपेज › Satara › दिवाळीनिमित्त उटणे, आकाश कंदील व परफ्युम वर्कशॉप

दिवाळीनिमित्त उटणे, आकाश कंदील व परफ्युम वर्कशॉप

Last Updated: Oct 14 2019 12:51AM
सातारा: प्रतिनिधी

दै.’पुढारी’ कस्तुरी क्लब आणि साई इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन, ब्युटी अ‍ॅण्?ड आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उटणे, आकाश कंदील आणि सुगंधी परफ्युमस् वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येवून ठेपली आहे. दिवाळी सणासाठी उटणे, आकाश कंदिल आणि सुगंधी परफ्युमस् या गोष्टींना अनन्य साधारण महत्व असते. प्रत्येक घरात दिवाळीनिमित्त या वस्तूंची हमखास खरेदी केली जाते.  त्यामुळे गृहिणींची गरज ओळखून दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत साई इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन आणि ब्युटी अ‍ॅण्ड आर्ट क्लास, विश्वविनायक प्रेस्टीज, कोल्हाटकर आळी मंगळवार पेठ येथे उटणे, आकाश कंदिल आणि सुगंधी परफ्युमस्  वर्कशॉपचे आयोजन  करण्यात आले आहे. 

बाजारातील रेडीमेड उटणे व परफ्यूम रासायनिक प्रक्रिया केलेले असते. त्यामुळे अ‍ॅलर्जी होवून त्वचेचे आजार उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी घरच्या घरी हर्बल सुगंधी उटणे व परफ्युम कसे तयार करावे याचे शास्त्रशुध्द  प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे. दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या आकाश कंदिल कार्यशाळेमुळे एक वेगळाच आनंद महिलांना मिळणार आहे.  कार्यशाळेत कागदापासून तयार होणारे विविध प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मयुरा कोल्हटकर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी कस्तुरी सभासदांना 50 रुपये व इतर महिलांना 100 रुपये प्रवेश शुल्क  आकारले जाणार आहे. नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी रुपेश 9762527109  येथे संपर्क साधावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ क्लबतर्फे करण्यात आले आहे.