होमपेज › Satara › सातार्‍यात चोरट्यांकडून ३० तोळे सोन्यावर डल्‍ला

सातार्‍यात चोरट्यांकडून ३० तोळे सोन्यावर डल्‍ला

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 1:37AMसातारा : प्रतिनिधी

रविवार पेठेतील संकल्प हाईट्स येथे मंगळवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून तब्बल 30 तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू 
होती.

अ‍ॅड. धनाजी शेलार व बाबाजी जाधव यांच्या घरी ही चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी हे दोन्ही फ्लॅट बंद होते. सांयकाळी संबंधित कुटुंबीय घरी आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरामध्ये जाऊन पाहणी केली असता, घरातील बहुतांश साहित्य विखुरलेले होते. चोरट्यांनी घरातील सोने व रोकड नेल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंबीय हादरून गेले आहे.

या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, रविवार पेठ हा कमालीचा वर्दळीचा परिसर आहे. हाकेच्या अंतरावर पोवई नाका असून भरदिवसा चोरट्यांनी ही घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.