Wed, Sep 19, 2018 11:16होमपेज › Satara › दरोडेखोरांना सात दिवसांची कोठडी

दरोडेखोरांना सात दिवसांची कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उंब्रज : प्रतिनिधी

सात दिवसापूर्वी उंब्रज येथे सशस्त्र दरोडा टाकून वृध्द महिलेचा खून करून लाखोंचे सोन्याचे दागिणे घेवून पोबारा केलेल्या चार दरोडेखोराना उंब्रज पोलिसानी मंगळवारी कराड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

.श्रीगोंदा जि.अ.नगर), देवराम घोगरे (रा.महाडुळवाडी, मांडवगण ता.श्रीगोंदा), दर्शन उर्फ अरूण दशरथ चव्हाण (रा.पद्मपूरवाडी ता.नगर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या घटनेतील अन्य दोन अरोपी अद्याप फरार आहेत.

दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी आणलेल्या इनोव्हा गाडीचालकासमवेत त्याची पत्नी सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चालकाने आरोपींना उंब्रज येथे सोडून तो नागठाणे येथे एका लॉजवर पत्नीसोबत थांबला होता. आरोपीनी दरोडयानंतर चालकास फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ते कर्नाटकच्या दिशेने गेल्याचे  तपासात समोर आले आहे. दरम्यान अनेक बाबींचा उलगडा होईल असे पो. नि. जोतिराम गुंजवटे यांनी सांगितले.