Tue, Apr 23, 2019 22:24होमपेज › Satara › अज्ञात वाहनाच्या धडकेत भांबे येथील एक जण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत भांबे येथील एक जण ठार

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:58PMउंब्रज : प्रतिनिधी

इंदोली (ता. कराड) गावच्या हद्दीत इंदोली ते चोरे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. सोमवारी (दि. 12) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मधुकर रामचंद्र  सोनटक्के (वय 47, रा. भांबे, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.  

सोमवारी सायंकाळी  मधुकर रामचंद्र सोनटक्के हे इंदोली ते चोरे रोडने भांबे येथे रस्त्याने चालत निघाले होते. त्यावेळी  इंदोलीवरून चोरेकडे जाणार्‍या अज्ञात ट्रॅक्टरसारख्या वाहनाने सोनटक्के यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये सोनटक्के हे जागीच ठार झाले. याबाबतची फिर्याद मृत सोनटक्के यांचा मुलगा अमित सोनटक्के याने उंब्रज पोलिस ठाण्यात दिली आहे.