Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Satara › कार अपघातात एक ठार

कार अपघातात एक ठार

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:32PMउंब्रज : प्रतिनिधी

चिपळूण - पंढरपूर राज्य मार्गावर सणगरवाडी (ता. पाटण) गावच्या हद्दीत कार चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर  आदळली. यावेळी एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला.

शिलेवंत गणपत कणसे (वय 56, रा.गडकर आळी, सातारा, मूळ गाव बनपुरी,  ता. खटाव,  जि. सातारा) असे अपघातातील मृत व्यक्तीचे  नाव  आहे, तर जगन्नाथ भगवान जांभळे (46, मरळी, मंडल अधिकारी, रा.शाहूपुरी, ता. सातारा) आणि राजेंद्र रंगराव खरात (41, रा.रेवडी, ता.सातारा ) (अव्वल कारकून) असे अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.

शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास उंब्रजहून पाटण दिशेकडे जाणारी फोर्ड कार (एम.एच.-09-बीएम-4455) ही सणगरवाडी गावानजीक आली असता, कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. यामध्ये कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने उंब्रज येथील प्रा.आ. केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच शिलेवंत कणसे यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी जगन्नाथ जांभळे आणि राजेंद्र खरात यांना उपचारासाठी कराड येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत शिलेवंत कणसे हे मंडल अधिकारी असून, ते सध्या पाटण तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होत, तर जखमी जगन्नाथ जांभळे हे मंडल अधिकारी आणि राजेंद्र खरात हे अव्वल कारकून म्हणून पाटण तहसील येथे कार्यरत आहेत.