Thu, Jun 27, 2019 02:05होमपेज › Satara › शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक

शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 10:42PMउंब्रज ; प्रतिनिधी

शहरी व ग्रामीण भागातील शिक्षणाची दरी भरून काढण्यासाठी शिक्षण देण्याच्या पध्दतीत बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 
उंब्रज येथील यशवंतराव जाधव विद्यालयात गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती आ.बाळासाहेब पाटील, जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सभापती देवराज पाटील, जि.प. सदस्या सौ.विनिता पलंगे, संस्थेचे सचिव हर्षवर्धन जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी कै.जयसिंगराव काशिद यांच्या स्मरणार्थ विद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी डॉ.अभय जाधव, डॉ. प्रविण कुलकर्णी, डॉ. स्वप्नील तपासे, डॉ.सुरज शेख, स.पो.नि.गजानन घाडगे यांच्यासह पांडुरंग पवार, व्ही. डी. माने, एस. पी. जगदाळे, प्रकाश जाधव, सौ.शीलादेवी पाटणकर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.सदस्य संपतराव जाधव, सोमनाथ जाधव, सुधीर जाधव, सरपंच सौ.लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, समीर जाधव, संग्रामसिंह पलंगे, सुधाकर जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक ए. डी. थोरगुले यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले. आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.