Sat, Jul 11, 2020 22:41होमपेज › Satara › उध्दव ठाकरे सहकुटुंब महाबळेश्‍वरमध्ये दाखल

उध्दव ठाकरे सहकुटुंब महाबळेश्‍वरमध्ये दाखल

Published On: Dec 06 2017 8:20PM | Last Updated: Dec 06 2017 8:52PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आपल्या कुटूंबासह बुधवारी दुपारी 4 वाजता महाबळेश्‍वर येथे विश्रांतीसाठी दाखल झाले. चार दिवस त्यांचा मुक्काम महाबळेश्‍वरमध्ये असणार आहे. या दौर्‍यात कोणत्याही राजकीय बैठका होणार नसून ते फक्त कार्यकर्त्यांची गाठभेट घेणार आहेत. 

नुकताच झालेला प. महाराष्ट्राचा दौरा व अन्य व्यस्त कार्यक्रमातून  उध्दव ठाकरे महाबळेश्‍वरात आले आहेत. दरवर्षी ते याच कालावधीत महाबळेश्‍वरमध्ये विश्रांती घेण्यासाठी येतात. त्यांचा मुक्काम येथील एका बंगल्यामध्ये आहे. चार दिवस ते कुटूंबांसह  पर्यटनाचा आनंद घेणार आहेत.

दुपारी 4 वाजता ते महाबळेश्‍वरमध्ये आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. ठाकरे ज्या बंगल्यामध्ये थांबलेले आहेत त्या बंगल्याच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गराडा होता. तसेच पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या या दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.