होमपेज › Satara › उद्धव ठाकरे आज कराडात 

उद्धव ठाकरे आज कराडात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (दि. 26) सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. कराडमधील भाजी मंडई येथे त्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. तत्पूर्वी ओगलेवाडी येथे ते शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. 

शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी, हमी भाव, नोटाबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ हे मोदी सरकारचे निर्णय जनतेच्या हिताविरोधी आहेत. या अन्यायाविरोधात उद्धव ठाकरे दौरे करत आहेत. शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी केले आहे.