होमपेज › Satara › उदयनराजेंच्या हाती पालिकेच्या डंपरचे स्टेअरिंग (Video)

उदयनराजेंच्या हाती डंपरचे स्टेअरिंग (Video)

Published On: Aug 25 2018 3:00PM | Last Updated: Aug 26 2018 1:29AMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकरता नगरपरिषदेने तयार केलेल्या आणि शासनाने मंजूर केलेल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्टनुसार दोन जेसीबी, दोन टिपर आणि एक ट्रॅक्टर, चार फॉगिंक मशिन, दोन ग्रास कटींग मशिन, जीईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी कचर्‍यासाठी नव्याने खरेदी केलेला टिपर स्वत: चालवून पाहिला. 

सातारा पालिकेच्यावतीने नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचे  लोकार्पण  खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती सौ.स्नेहा नलवडे, मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती सौ.संगिता आवळे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, यांचे सह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, कचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. कचरामुक्‍त शहर ही सातारकरांच्या हिताची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली असून या वाहनांचा कार्यक्षम वापर करुन, कचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या, अशा आदेशवजा सूचनाही त्यांनी केल्या. 

ते पुढे म्हणाले, सर्वप्रथम सातारा विकास आघाडीनेच कुंडीमुक्‍त शहर संकल्पना राबवली आणि घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडयांचा उपक्रम राबवला असून तो पूर्ण यशस्वी ठरला. घंटागाडयांचा नगरपालिकेचा आदर्श पुढे अनेक शहरांनी घेतला. आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गात ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करुन, त्यावर कंपोस्ट डेपोवर  प्रक्रीया करुन, खतनिर्मिती करण्यात येणार आहे. खतनिर्मिती प्रकल्पाचे चार कोटींचे काम सुरु करण्यात आलेले आहे.

कोणत्याही परिस्थितीत कचरा योग्य वेळी उचलला जावा म्हणून यांत्रिकीकरणावर भर देत आज एकूण 70 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीतही उपयोग केला जावू शकणार असून, कचरा साठू नये म्हणून आधुनिक पध्दतीची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.

प्रारंभी खा. उदयनराजे भोसले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचे पुजन करण्यात आले. तसेच नव्याने घेतलेल्या टिपरच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, यशोधन नारकर यांना समवेत घेत त्यांनी  स्वतः टिपर वाहन चालवून बघितले.

यावेळी अ‍ॅड.डि.जी.बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजु भोसले, माजी आरोग्य सभापती वसंतअण्णा लेवे, बबलु साळुंखे, नगरसेविका लता पवार,सौ.सुमती खुटाळे, सुनिता पवार, सविताताई फाळके,सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, अल्‍लाउद्दीन शेख, किशोर शिंदे आदी मोठया संख्येने  उपस्थित होते.

(व्हिडिओ : इम्तियाज मुजावर)