Sun, May 26, 2019 16:40होमपेज › Satara › Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे

Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे

Published On: May 14 2018 10:34AM | Last Updated: May 14 2018 12:23PMसातारा : पुढारी ऑनलाईन

शरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडली, याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी म्हटले. शरद पवार यांनी सातारा येथे कॉलर उडविल्याबाबत विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले की, कितीही केले तरी ते आदरणीय आहेत. मी त्यांना मानतो. त्यांच्याएवढे काम कोणालाही जमणार नाही. सकाळी 7 वाजता ते तयार असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही अनुकरण करतो. मात्र त्यांनी माझे अनुकरण केले. आणखी काय पाहिजे? असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.  

साताऱ्यातील राष्ट्रवादीमध्ये सुरु असेल्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.  शरद पवार आदरणीय व्यक्ती असून त्यांना माझी  स्टाईल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे 

वाचा : लोकसभेचे तिकिट मलाच अन्यथा अपक्ष : उदयनराजे