Mon, Aug 26, 2019 01:31होमपेज › Satara › खासदार उदयनराजे भोसले व  आमदार शिवेंद्रराजेंनी एकत्र यावे : हेमंत पाटील

खासदार उदयनराजे भोसले व  आमदार शिवेंद्रराजेंनी एकत्र यावे : हेमंत पाटील

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:40PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याचे  प्रमुख नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले एकत्र आले तर जिल्ह्याचा कायापालट होवून विविध कामे मार्गी लागतील. कार्यकर्त्यांचा फायदा होईल, असा विश्‍वास भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्या ज्या वेळी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे एकत्र आले त्या त्या वेळी जिल्ह्यातील जनता गुण्यागोविंदाने राहत होती. पंरतु आत्ता जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर भावना वाढणार असून त्याचा तोटाच सहन करावा लागणार आहे. दोन्ही राजांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा फटकाही बसणार आहे. त्यामुळे त्यांनी एकत्रच रहावे व  खा. उदयनराजे यांनी लोकसभेला  तर आ. शिवेंद्रराजे यांनी विधानसभेला निवडून यावे.

काहीजण त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करुन भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना वाटते की हे दोघे विरोधात असले तर आम्हाला किंमत मिळेल. काहींना वाटते हे दोघे एकत्र आले तर राजकीय फायदा होईल. मात्र त्यामुळे कोणालाही काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे दोन्ही राजांनी एकत्र यावे, असे पत्रकात म्हटले आहे.