Wed, Feb 26, 2020 09:37होमपेज › Satara › दुचाकी झाडावर आदळून दोन भाऊ ठार

दुचाकी झाडावर आदळून दोन भाऊ ठार

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:49PM

बुकमार्क करा
वेणेगाव : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील काशीळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून कराडला होंडा हॉर्नेट कंपनीच्या दुचाकीवरून जात असताना हायवेलगत असणार्‍या झाडावर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात ऋतुराज रामचंद्र साळुंखे  (वय 21) व कौस्तुभ रामचंद्र साळुंखे  (वय 24, दोघेही रा. साबळेवाडी, ता. कराड, सध्या रा. पुणे) या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांनी भेट देऊन अपघातस्थळाची पाहणी केली. 

साबळेवाडीतील या दोन भावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याने साळुंखे कुंटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास सपोनि संतोष चौधरी करीत आहेत.