Sun, Jul 21, 2019 07:49



होमपेज › Satara › लोणंद येथे अपघातात दोन महिला ठार

लोणंद येथे अपघातात दोन महिला ठार

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:44PM

बुकमार्क करा




लोणंद : प्रतिनिधी

लोणंदजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून दुचाकीचालक जखमी झाला आहे. लोणंद पोलिस ठाण्याजवळील वळणावर रविवारी रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

वासंती चिकूदाना भोसले (वय 50, रा. चव्हाणवाडी, ता. फलटण) व बिटकू पसीना पवार (वय 40, रा. टेंभूर्णी) अशी मृत महिलांची नावे आहेत. या अपघातात बायजा शांताराम शिंदे हा जखमी झाला आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर लोणंद बाजूकडून फलटणच्या दिशेने निघाला होता. लोणंदमध्ये पोलिस ठाण्याजवळील वळणावर ट्रिपल सिट आलेली दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉली यांची जोरदार धडक झाली.

त्यामध्ये वासंती भोसले या जागीच ठार झाल्या, तर बिटकू पवार यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार बायजा शिंदे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  दोन्ही मृत महिलांचे शवविच्छेदन लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.