Thu, Jun 20, 2019 01:29होमपेज › Satara › अक्‍कलकोट पोलिसांत दोघे संशयित हजर 

अक्‍कलकोट पोलिसांत दोघे संशयित हजर 

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:30PMवाई : प्रतिनिधी

पसरणी घाटातील आनंद कांबळे खूनप्रकरणी अक्‍कलकोट पोलिसांसमोर दोघे संशयित हल्लेखोर हजर झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, निखिल सुदाम मळेकर व दीक्षा आनंद कांबळे या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

शनिवार (दि. 9) रोजी महाबळेश्‍वरला फिरायला निघालेल्या आनंद कांबळे याचा त्याची पत्नी दिक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल मळेकर यांनी कट रचून खून केला होता.  दिक्षाने या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मळेकर याला पुणे येथून ताब्यात घेतले होते तर  या प्रकरणातील मळेकर याचे अन्य साथीदार  फरार होते. 

पोलिसांनी मळेकर व दिक्षा कांबळे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिल अ‍ॅड. आर. पी. सोनावणे व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी  पोलिस कोठडीची मागणी केली. संशयीत आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आनंद कांबळे याचा खून केला. हा कट कोठे व कसा रचला, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करावयाचे आहे, गुन्ह्यातील अन्य फरार साथीदार व दुचाकींचा शोध घेणे, सखोल चौकशी करणे आदी कारणांसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दिक्षा कांबळे व निखिल मळेकर यांना न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपींपैकी दोघे जण अक्‍कलकोट पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.