Thu, Feb 21, 2019 11:40होमपेज › Satara › लाचखोर पोलिस गजाआड

लाचखोर पोलिस गजाआड

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:34PMमारूल हवेली : वार्ताहर 

गुन्ह्यात मदत करण्यासह चाप्टर केस न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणार्‍या पाटण (जि. सातारा) पोलिस ठाण्याच्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. 

संजय बाळकृष्ण राक्षे (रा. कार्वे नाका, पोलिस लाईन, कराड) आणि कुलदीप बबन कोळी (खराडे कॉलनी, कार्वे नाका, कराड) अशी त्यांंची नावे आहेत. हे दोघेही पाटण पोलिस ठाण्यात कार्यरत असून, त्यांनी एका व्यक्‍तीकडे दोन हजारांची लाच मागितली होती.

याबाबत संबंधित तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत राक्षे व कोळी प्रथमदर्शनी दोषी असल्याचे समोर आले. तसेच हवालदार संजय राक्षे यांना लाच स्वीकारताना पाटण पोलिस ठाण्याच्या परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला, आनंदराव सकपाळ, भरत शिंदे यांच्यासह सहकार्‍यांनी कारवाई केली.