Wed, Nov 14, 2018 14:42होमपेज › Satara › चोरलेल्या आणखी दोन दुचाकी जप्त

चोरलेल्या आणखी दोन दुचाकी जप्त

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 11:48PMकोरेगाव : प्रतिनिधी

विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकीचोरी प्रकरणातील अटक केलेला अजय मारुती काटे, रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव याच्याकडून आणखी दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, त्यास न्यायालयाने दि. 14 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने अजय काटेस अटक केली होती.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने कोरेगावातून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच कर्नाटकातील विजापूर येथून बुलेट व पेण-रायगड येथून पल्सर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पथकाने दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.