Thu, Apr 25, 2019 03:42होमपेज › Satara › कराडात ट्रकने दोघांना चिरडले

कराडात ट्रकने दोघांना चिरडले

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 11:13PMकराड : प्रतिनिधी

मॉनिर्ंग वॉकला गेलेल्या वृद्धासह कराडमधील दोघांना चिरडून ट्रक चालकाने वाहनासह पलायन केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. कराडमधील मुख्य व वर्दळीच्या मानल्या जाणार्‍या दत्त चौकातील या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहेत.सुनील आनंदा माने (वय 54, रा. गुरुवार पेठ, कराड) हे दुर्दैवी अपघातात ठार झाले आहेत.  तर दशरथ महादेव सूर्यवंशी (वय 64, रा. बुधवार पेठ, कराड) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.

माने व सूर्यवंशी हे दोघे मित्र असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दररोज सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात असत. रविवारी हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. दत्त चौकात आल्यानंतर त्यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शनही घेतले आणि त्यानंतर ते बसस्थानकाच्या दिशेने चालत निघाले होते. यावेळी सूर्यवंशी यांच्याकडे सायकल होती. मात्र, माने यांच्याकडे सायकल नसल्याने ते दोघे चालत दत्त चौकातून बसस्थानक परिसराकडे निघाले होते.

याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत माने यांच्या डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर दुखातप झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुर्यवंशी हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ज्या ट्रकने धडक दिली, त्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले आहे. या ट्रकसह चालकाचाही पोलिसांकडून शोध सुरू असून अपघातांची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

त्यांनी मित्राला वाचवले पण ...

दत्त चौकात ट्रक आपल्याच दिशेने येत असल्याचे प्रथम माने यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता सूर्यवंशी यांना बाजूला ढकलत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूर्यवंशी यांना वाचवण्याच्या प्रयत्नात माने स्वत:च ट्रकच्या चाकाखाली सापडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलिसांनीही यास दुजोरा दिला आहे.

 

Tags : satara, karad, karad news, accident, Two injured,