Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Satara › ट्रक पलटी; दोन जखमी

ट्रक पलटी; दोन जखमी

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:20PMविडणी : वार्ताहर

बंगलोर येथून पुण्याकडे पीव्हीसी पाईप घेऊन निघालेला ट्रक विडणीजवळील राऊ-रामोशी पुलावरील वळणावर पलटी होऊन दोन जण जखमी झाले. 

याबाबत माहिती अशी, शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महाड-पंढरपूर महामार्गावर विडणीनजिक असणार्‍या राऊ - रामोशी पुलाच्या वळणावर बंगलोर येथून पी. व्ही.सी. पाईप घेवून निघालेला ट्रक क्रं. केए 28 बी 3628 पलटी झाला. या अपघातात चालक चंद्रकांत तुकाराम हरजन (वय 43) रा. चडचण, ता. इंडी, जि. विजापूर व गणपत तुकाराम अहिवळे  (वय 25) रा. कंचनाळ, ता. इंडी, जि. विजापूर हे जखमी झाले. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे.

राऊ-रामोशी पुलावर सततच अपघाताची मालिका सुरू असून दोन दिवसांपर्वूीही याठिकाणी कंटेनर पलटी झाला होता. या पुलाच्या धोकादायक वळणाबाबत संबंधित खाते किती जीव गेल्यानंतर ठोस पावले उचलणार असा संतप्त वाहनचालकांमधून  होत आहे.