Sat, Mar 23, 2019 01:55होमपेज › Satara › आटकेत दोन कुटुंबात धुमश्‍चक्री

आटकेत दोन कुटुंबात धुमश्‍चक्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबात आटके (ता. कराड) येथे जोरदार धुमश्‍चक्री उडाली असून यात एकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य दोघांनाही जबर मार लागला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील 13 जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अविनाश सुनिल बामणे आणि उमेश भगवान पांडवर यांनी याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. यात सुनिल बामणे यांच्यासह भगवान पांडवर आणि अंकुश संकपाळ हे तिघे जखमी झाले असून सुनिल बामणे हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर कराडमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अविनाश बामणे यांच्या तक्रारीवरून उमेश भगवान पांडवर, उमेश याचा दाजी अंकुश संकपाळ, अंकुश यांचा भाऊ, उमेशची आई, बहिण तसेच भगवान पांडवर यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर उमेश पांडवर याच्या तक्रारीवरून अविनाश बामणे, बाळू आनंदा बामणे, कुमार प्रल्हाद बामणे, किरण प्रल्हाद बामणे, अरविंद पाटील, गणेश व नायकांचा दाद्या (पूर्ण नावे माहित नाहीत) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आटके गावच्या हद्दीत पाटलांचे विहिर परिसरात अविनाश बामणे हे आपल्या सहकार्‍यांसोबत टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते.

त्याचवेळी अविनाशचे वडील सुनिल बामणे हे शेतात निघाले होते. यावेळी उमेश पांडवर याने सुनिल बामणे यांना बोलावून घेत वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी उमेश तसेच अंकुश संकपाळ यांच्यासह अन्य संशयितांनी सुनिल बामणे यांना मारहाण केली. तसेच यावेळी लाकडी फळीडोक्यात मारल्याने सुनिल बामणे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, उमेश पांडवर याने पूर्ववैमनस्यातून सुनिल उर्फ बाळू बामणे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी लाकडी दांडक्यासह हाताने मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक फौजदार एक्के यांच्यासह हवालदार भोसले हे करत आहेत.

Tags : satara news, Two family members, fight, karad,


  •