Fri, Jan 18, 2019 01:24होमपेज › Satara › कराडात संशियतरित्या फिरणाऱ्या दोघांना अटक

कराडात संशियतरित्या फिरणाऱ्या दोघांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड: प्रतिनिधी 

कराड शहरातील विजय दिवस चौक आणि कोल्हापूर नाक्याजवळील कालिदास मार्केट परिसरात मंगळवारी मध्यरात्री संशयास्पदरित्या वावरणाऱ्या दोन संशयितांना कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. सतीश उर्फ संतोष शंकर संपकाळ (वय ३९, रा. शिंदे मळा, बावची रोड, आष्टा) आणि तौफिक उर्फ मदन लतीफ मुजावर (वय २७, दत्त मंदिराजवळ, तासगाव रोड, कोटभाग, वाळवा) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. 

संपकाळ हा कोल्हापूर नाका परिसरातील कालिदास मार्केट येथे मोटारसायकलवरून आला होता. तसेच रात्री साडे बाराच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला तो संशियित हालचाली करताना आढळले. दुसरीकडे मुजावर हा विजय दिवस चौक परिसरात मोटारसायकलवरून येऊन लपून बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुजावरला रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. 
सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली असून मुंबई पोलिस कायद्यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

Tags : Arrested, Karad, Karad Police, Intruding Case, Superstore, Main City  Area 


  •